दोघांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या लिंबू राक्याला पेालिसांकडून अटक

0

एक दिवसांची पोलीस कोठडी ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव- तु दादा झाला आहे, तुला संपवून टाकेन, अशी धमकी देवून गणेश भास्कर सोनार वय 19 रा. लक्ष्मीनगर, याच्यासह एकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात लिंबू राक्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी राकेश चंद्रकांत साळुंखे (कोळी) वय 23 रा. कांचननगर यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

16 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गणेश सोनार हा त्याचे मित्र जगदीश सुकलाल भोई रा. कोळीपेठ व विष्णु गोविंद प्रजापती यांच्यासह गांधी उद्यानाकडून पांडे चौकाकडे पायी जात होते. रस्त्यात राकेश कोळी उर्फ लिंबू राक्या गाडीवर थांबलेला होता. राक्याने जात असलेल्या गणेशला उद्देशून तु दादा झाला आहे का? असे म्हणत कानशिलात लगावली तसेच तुला संपवून टाकेन असे म्हणत त्याच्यावर चाकून वार केला. गणेशला सोडविण्यासाठी विष्णु मध्ये पडला असता त्याच्यावरही राक्याने वार केले. यानंतर भितीने विष्णु व जगदीश पळून गेले. याप्रकरणी गणेश सोनार यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लिंबू राक्या विरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. लिंबू राक्याबाबत जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली त्यानुसरा पथकाने 9 रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास शहरातून अटक केली. सोमवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारी पंच मिळण्यास उशीर
दरम्यान सेशन कमिट गुन्हा असल्याने गुन्ह्याचा मेमोरंडम पंचनाम हा सरकारी पंचासमक्ष करणे आवश्यक आहे. 10 रोजी रविवार असल्याने पंच मिळाले नाही, सोमवारी पंच मिळणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांना पत्र देर्णयात आले मात्र त्यांनी पत्र न घेता पंच देण्यास नकार दिला, भुमीअभिलेख कार्यालय, उपअधीक्षक यांना पत्र देण्यात आले. त्यांनी सोमवार दुपारी उशीरा एक पंच दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. व हत्यार जप्त करुन पंचनामा करणेकामी पुरेसा वेळ मिळाला नाही, असेही म्हटले आहे.