दोघा पोलीस उपनिरीक्षकांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर

0

तर्‍हाडी । महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी धुळे जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पोतदार यांचा पदकवीरांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचे अभिनंदन केले आहे.

पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी हे 1983 मध्ये धुळे पोलिस दलात भर्ती झाले. त्यांनी आझादनगर पो.स्टे., शहर पो.स्टे.,ल मोहाडी पो.स्टे. व स्था.गु.शा.धुळे याठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करुन चोरी, घरफोडी, यासारखे मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक केली. तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून त्यांचे 34 वर्षाच्या कामगिरीबद्दल आतापावेतो त्यांना वरिष्ठांकडून 225 रु.चे बक्षीस मिळाले असून मागील वर्षी 2016 मध्ये पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पोतदार हे 1983 मध्ये धुळे पोलिस दलात भर्ती झाले. त्यांनी नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, नरडाणा, शिंदखेडा पोलिस ठाणे धुळे याठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करुन खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारखे मालमत्तेचे गंभीर गुन्हे उघडकीस आणुन आरोपींना अटक केली. तसेच त्यांनी तपास केलेल्या अनेक गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. 1992 मध्ये नंदुरबार शहरात झालेल्या जातीय दंगलीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांनी गौरव केला आहे. 2016 मध्ये पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह त्यांना मिळाले आहे. वरील कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती, यांचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.