पुणे । वानवडी येथील हॅचिंग स्कुलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या अमिषाने अनेकांना 35 लाख 39 हजार 450 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले दोघे एजंट असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्य दोघांना 1 ऑगस्टापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. श्रीपती धोंडिबा कोडीतकर (वय 49, रा. आंबेगाव पठार) आणि विशाल मोहन नवले (वय 35, रा. धायरी) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी अनिल राजाराम शिंदे (रा. हडपसर) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.