अमळनेर । जळगाव येतील दोडे गुर्जर संस्थान संचलित अमळनेर दोडे गुर्जर बोर्डिंगच्या अध्यक्षपदी हभप ज्ञानेश्वर पवार, उपाध्यक्षपदी जी.आर. पाटील तर सचिवपदी चंद्रकांत पाटील, सहसचिवपदी प्रा.डॉ.डि.आर.चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारी मंडळही निवडण्यात आले.
निवड प्रक्रिया संस्थानचे अध्यक्ष इंजि. चंद्रशेखर पाटील व अमळनेर बोर्डिंगचे शिल्पकार नॅनोतज्ञ प्रा.डॉ.एल.ए. पाटील, बळीराम सुर्यवंशी, प्रल्हाद चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील अमळनेर येथे संस्थेच्या कार्यालयात राबविण्यात आली. त्यात 21 संचालकांच्या कार्यकारी मंडळात 17 पुरूष संचालक तर चार महिला संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी याप्रमाणे
निवड करण्यात आलेले महिला व पुरुष संचालक खालील प्रमाणे लताबाई चौधरी, वंदनाबाई पाटील, अनिता पवार, शोभाबाई पाटील या चार महिलांना पहिल्यांदाच संचालक म्हणून स्थान देण्यात आले. तर पंडित पाटील, मगन पाटील, श्रीकृष्ण पाटील, बळीराम सुर्यवंशी, हभप अंबादास चौधरी, गोपाल पाटील, अॅड.जितेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी, मुकदास पाटील, देविदास पवार, डॉ. प्रशांत पवार, अॅड पी.डि.पाटील, सचिन पाटील आदींची संचालक म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडि बद्दल नविन कार्यकारिणीचे समाजातून अभिनंदन होत आहे.