यावल ( प्रतिनिधी ) लग्न होत नाही या नैराश्येतुन कष्टकरी वृद्ध आई वडिलांंचा आधारस्तंभ व तिन बहीणींच्या एकुलत्या एक भाऊ असलेल्या अविवाहीत तरुणाने घेतले टोकाचे पाऊल दारूच्या व्यसनामुळे आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची झाली नोंद . या संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , बळीराम अरूण पाटील वय३७ वर्ष राहणार दोणगाव तालुका यावल या अविवाहीत तरूणाने दिनांक २४ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याच्या एंगलता साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . सदर तरूण अविवाहीत असल्याने त्यास दारूचे व्यसन जडल्याची माहिती कळाली असुन,बळीराम पाटील हे अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता,यावलच्या ग्रामीण रुग्णालयात बळीराम पाटील या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केली . याबाबत विवेक धनराज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान व पोलीस करीत आहे .