दोधे ता. रावेर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत, “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात आले…
भुसावळ प्रतिनिधी दि 13
दोधे ता. रावेर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वतंत्रता सैनानी आणि भारत मातेच्या वीर सपुतांचा सन्मान करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, वीरो को वंदन हे अभियान राबवून, भवानी माता मंदिर परिसरात गांवातील माती अमृत कलश मध्ये संकलित करण्यात आली.
तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच ७८२००७८२०० मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्यात येऊन सरल अॅप डाऊनलोड करण्यात येऊन, मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी सभापती जितेंद्र पाटील, दुर्गादास पाटील, पी.के.महाजन, तालुका उपाध्यक्ष वासू नरवाडे, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, तालुका चिटणीस विजय महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, चेतन पाटील, नितीन पाटील, असिफ पिंजारी, रवींद्र पाटील, उमेश कोळी, गोकुळ विठ्ठल पाटील, राहुल सीताराम महाजन, नंदू सदाशिव पाटील,जनार्दन शांताराम पाटील, गोपाळ सोपान पाटील, रविंद्र साहेबराव पाटील, सुकदेव लहू पाटील, योगेश हरिदास पाटील, श्रीनिवास गोंडू पाटील, हर्षल अरुण महाजन, प्रभाकर भागवत पाटील, प्रविण डिगंबर पाटील ई. उपस्थित होते.