पाळधी। येथून जवळच असलेल्या दोनगाव बुद्रुक येथे जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीचा झोपेतच दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. जन्मदात्याने मुलीचा खून केल्यानंतर स्वत:हून पोलीस स्थानकात हजर राहून खून केल्याची कबुली दिली. गावातील पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून बापावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुताच्या दोरीने केला खून: दरम्यान, बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घरात सर्व झोपलेले असतांना संतप्त विश्वास पाटील हे दिपालीच्या खोलीत शिरले व त्यांनी सुताच्या दोरीने झोपेतच दिपालीचा गळा आवळून खून केला. विश्वास पाटील यांची पत्नी दुसर्या खोलीत झोपलेली असल्यामुळे त्यांना याची चाहूल लागली नाही. पहाटे सहा वाजेच्या सुमारास विश्वास पाटील हे दोनगाव बु॥चे पोलीस पाटील यांच्याकडे स्वत:हून गेले व सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलीस पाटील त्यांना पाळधी पोलीसस्थानकात घेवून गेले. पोलीसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. पोलीसांनी विश्वास पाटीलला अटक करीत वैद्यकीय तपासणीसाठी नेले. या प्रकरणी विश्वास पाटीलच्या फिर्यादीवरुन त्याच्याचविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बी.डी.सोनवणे, सपोनि व्ही.पी.देशमुख, पोउनि आर.एन.सोमवंशी, रमेश पाटील आदी करीत आहेत.
मानहानीने होते अस्वस्थ
विवाहित दिपालीचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला परंतू गल्लीत राहणार्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दिपाली त्या मुलासोबत पळून गेल्याने पाटील यांना समाजात मानहानी सहन करावी लागली मुलगी घरी आल्यानंतर समजावूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही दिवसांपासून घरात वातावरण तणावग्रस्त होवून रोज भांडण होत होती. मुलीने नवर्याच्या घरी नांदावयास जावे असा वडिलांचा आग्रह होता.