दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा-रामदेव बाबा

0

हरिद्वार – देशासमोर वाढती लोकसंख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर योगगुरु रामदेव बाबा यांनी भाष्य केले आहे. ‘जी लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसावा’, असे मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. शिवाय, माझ्याप्रमाणे जी लोक लग्न करणार नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमाला बाबा रामदेव संबोधित करत होते.

पुरातन काळात लोकसंख्या कमी होती, या पार्श्वभूमीवर वेदांमध्ये 10-10 अपत्यांना जन्म देण्यास सांगितले गेले आहे. आता ज्यांचे सामर्थ्य आहे, त्यांनी करावे. पण आता तशीही देशाची लोकसंख्या 125 कोटी एवढी आहे. मात्र जर कोणी बुद्धिमान पुरुष किंवा स्त्री आहे आणि जर ते पूर्णतः जागृत आत्मा असतील तर ते एकटेच हजारो, लाखो, कोट्यवधींवर भारी पडतात, ही भारतीय ज्ञानाची परंपरा आहे असे रामदेव बाबा म्हणाले.