दोन्ही कॉंग्रेसपेक्षा काळू-बाळूचा तमाशा बरा:गिरीश बापट

0

पिंपरी-काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष होता. आज 70 वर्षांनी या देशात काँग्रेस एवढे वाईट हाल कोणाचेच झाले नाहीत. काँग्रेस सगळ्यांना एकत्र करून आपल्या विरोधात लढत आहे. दोन काँग्रेसचे तर काय वर्णन करावे. यांच्यापेक्षा काळू-बाळूचा तमाशा बरा, त्यातून काहीतरी करमणूक तरी होते. हा तमाशा फारच विचित्र आहे, असा हल्लाबोल पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर केला.

पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना पदाधिका-यांच्या आज (मंगळवारी) आकुर्डीत आयोजित केलेल्या आकुर्डीतील बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट बोलत होते. काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष होता. 1952 साली ज्या निवडणुका झाल्या. त्यावेळी काँग्रेसला पर्यायच नव्हता. त्यामुळे अनेक वेळा पर्याय नाही म्हणून काँग्रेसला निवडून देत होते. नंतरच्या काळात छोटे-छोटे पक्ष एकत्र यायचे आणि काँग्रेसच्या विरोधात लढायचे. आज 70 वर्षांनी या देशात या देशातकाँग्रेस एवढे वाईट हाल कोणाचेच झाले नाहीत.

आजमितीला देशात दोन हजार 40 राजकीय पक्ष देशात आहेत. तर, महाराष्ट्रात 198 राजकीय पक्ष आहेत. नावानिशी एक पार्टी आहे. त्यापैकी भाजप-शिवसेना म्हटले की लोक ओळखतात. काँग्रेसचे विचारले की कुठला काँग्रेसच्या शरद पवार यांच्या काँग्रेसचा का? अजित पवार यांच्या काँग्रेसचा, पार्थच्या, परमार्थच्या की कुणाच्या काँग्रेसचा असा प्रश्न पडतो. कारण यांच्या प्रत्येकाच्या नावाने यांची पार्टी आहे, अशी टीकाही बापट यांनी केली.