पुणे । सकल मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक वढु गावामधे जाऊन दोन्ही समाजासोबत बैठक घेऊन दोन्ही समाजात सलोखा रहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. भीमा कोरेगाव येथील घटनेसंदर्भात बुधवारी सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे यांची बैठक शिवाजीनगर येथे झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पदाधिकार्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सूत्रधारावर कडक कारवाई करा
यावेळी बोलताना पदाधिकार्यांनी सांगितले की, पुण्यातील मराठा मोर्चाचे समन्वयक वढु गावामधे जाऊन दोन्ही समाजांसोबत बैठक घेऊन समाजातील तेढ कमी करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. ज्या कारणावरून हा वाद सुरु झाला त्या वादग्रस्त बोर्डवरील मजकुराची सत्यता इतिहासतज्ज्ञासोबत चर्चा करून तपासली जावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. दंगल माजविणार्या सूत्रधारावर कडक कारवाई करावी अशीच भूमिका मराठा मोर्चाची असल्याचे देखील या वेळी स्पष्ट करण्यात आले.
पोलीस प्रशासन जबाबदार
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मराठा समाजाच्या मृत युवकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये द्यावेत आणि 50 जणांवरील ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात अली.
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्या आणि शासकीय मालमतेच नुकसान करणार्यावर कारवाई करण्यात यावी.
ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनदेखील पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली नाही त्यामुळे त्या जबादार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी देखी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा वतीने करण्यात अली.