दोन अपघातात एक ठार, बारा जखमी

0

धुळे । सुरत महामार्गावर मोटरसायकल आणि लक्झरीला झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार वृध्द जागीच ठार झाला तर लक्झरी पलटून झालेल्या अपघातात 12 जण जखमी झाले आहे. धुळे शहरातील राजवाडे बँकेसमोर राहणारे दिलीपकुमार रामशंकर भट (वय 60) हे शुक्रवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलने सुरत महामार्गावर जात असतांना सुरत बायपास रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. पत्नी किरणबाई हिने दिलीपकुमार यांना हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात सकाळी 7.45 वाजता दाखल केले होते.

जखमी हिरे रूग्णालयात दाखल
दुसरा अपघात सुरत महामार्गावर आनंदखेडे गावाजवळ झाला. शुक्रवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास भरधाव जाणारी लक्झरी बस आनंदखेडे गावच्या शिवारातील पेट्रोल पंपाजवळ पल्टी झाली. या अपघातात मालूबाई नारायण टिकार, सतीष नारायण टिकार, आशाबाई तिर्थराज, तिर्थराज विष्णू तोताराम काशिनाथ मिस्तरी, प्रकाश पुंडलिक राठोड, कैलास पोपट जाधव, मुदस्सर हुसेन, अब्दुल सलीम, नाजनीन सादीक,अर्चना संतोष रणचौरे, तुळशीराम खर्डे हे जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.