दोन अपघातामध्ये 3 ठार 1 जखमी

0
लोणावळा : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दोन अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. एक अपघात सायंकाळी सात वाजता द्रुतगती महामार्गावर मळवलीजवळ तर दुसरा राष्ट्रीय महामार्गावर पावणेदहा वाजता वाकसई फाट्याजवळ झाला. द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एका पादचार्‍याला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर राष्ट्रीय महामार्गावर वाकसई फाट्याजवळील गोविंदा हॉटेलसमोर छेद रस्त्यावरुन वळणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनांची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस कर्मचारी चाकणे, जितेंद्र दीक्षित, मयूर अबनावे यांनी सदरचे मृतदेह ताब्यात घेऊन शवागारामध्ये दाखल केले.