दोन एकल नाट्यआविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

0
स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे ‘एक स्लाईस ब्रेड’ व ‘वनामखी’चे सादरीकरण
 
भुसावळ :- शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी ‘एक स्लाईस ब्रेड’ व ‘वनामखी’चे सादरीकरण करण्यात आले. खान्देशात प्रथमच हिंदी एकल नाट्यप्रयोग झाल्याने रसिकांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. दोन्ही नाटकांनी प्रेक्षकांच्या भावनांना अक्षरशः हात घातला.
‘वनमाखी’ने रसिक हेलावले
मध्यप्रदेश नाट्य विद्यालयाच्या गरीमा मिश्रा यांनी मनिषा कुलक्षेत्रा यांच्या कथेवर बेतलेले व सारांश भट यांनी दिग्दर्शीत केलेले ‘वनमाखी’ हे एकल नाट्य (सोलो प्ले) सादर केले. राजस्थानची पार्श्‍वभूमी असलेल्या ‘वनमाखी’ नाट्यात ‘कठपुतली’ प्रकाराचा अत्यंत कलात्मकरीत्या वापर करण्यात आला होता. गरीमा मिश्रा यांनी आपल्या अभिनयातून वृध्दाशी लग्न झालेल्या बालविवाहितेची घुसमट अत्यंत प्रभावीपणे मांडली. प्रकाश, संगीत आणि सुचक नेपथ्याच्या माध्यमातून गरीमा यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यानंतर मध्यप्रदेश नाट्यविद्यालयाच्या भूषण शिंपी यांनी ‘एक स्लाईस ब्रेड’ हे योगेश पाटील दिग्दर्शीत एकल नाट्य सादर केले. ‘भाकरी’ साठी धडपडणार्‍या रोमी व ओमी या दोन अनाथ बालकांची या हृदयस्पर्शी कथेचा नाट्यविष्कार सादर करुन भुषण शिंप यांनी प्रेक्षकांना हेलावून टाकले. हृदयस्पर्शी संवाद व अचूक देहबोलीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक सशक्त संदेश पोहचविण्यात भुषण शिंपी यशस्वी झालेत.
 यांनी घेतले परीश्रम
दोघाही प्रयोगांची तांत्रिक बाजू योगेश पाटील व अक्षय नेहे यांनी पार पाडली. प्रास्ताविक व सुत्रसंचलन स्नेहयात्रीच्या तुषार जोशींनी केले तर आभार विरेंद्र पाटील यांनी मांडले. प्रयोग यशस्वीततेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी, स्नेहयात्री प्रतिष्ठानचे विश्‍वजीत घुले, नारायण माळी, हरीष कोळी, धनराज कुंवर, मयुर सुरवाडे, सुमित पाचपांडे, शाम पाटील, आदर्श पंड्या, मानसी पाटील, अक्षय परदेशी, रोशनी परदेशी यांनी परीश्रम घेतले.