कल्याण । कल्याण- डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात घरफोडीच्या घटना वाढत असून नागरिक धास्तावले आहेत. त्यातच शुक्रवारी टिळक नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील ग्रोग्रासवाडी सरोवर प्रथमेश सोसायटीमध्ये राहणारी महिला शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व मोबाईल असा मिळून 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
रोकडसह दागिने पळवले
दुसरी घटना टिळक नगर परिसरातील नवआनंद सोसायटीमध्ये राहणारे महिला शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरला कुलूप लावून याच इमारती राहणार्या त्याच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 3 लाख 46 हजारांचे सोन्याचे दागिने घेवून लंपास केले. या दोन्ही प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.