गांधीनगर-गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांची कार दोन ट्रकच्या मधे आल्याने चिरडली गेली.
भचाऊ येथील महामार्गावर हा अपघात झाला. मीठाने भरलेल्या ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि चालक चुकीच्या दिशेने ट्रेलर नेऊ लागला. त्याचवेळी एसयूव्ही कारला त्याने धडक दिली. कारमधून एकूण ११ जण प्रवास करत होते. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जिल्हा प्रशासनाला पीडितांसाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा आदेश दिला आहे.