जळगाव। नदीपात्रातून विनापरवाना चोरटी वाहतुक करणार्या 2 डंपर व एका ट्रॅक्टरवर तहसिलदारांच्या पथकाने कारवाई केली असून चालक-मालकांविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील डिकसाई फाटयाजवळ, कानळदा-अमोदा रोडवरील कुंवारखेडा फाटयाजवळ व सावखेडा शिवारातील गिरणानदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपर क्रमांक एमएच. 19. बीएम. 7071 वरील चालक दिपक कमलाकर अत्तरदे, रा. जळगाव, डंपर क्रमांक एमएच. 19. झेड. 3616 वरील चालक व मालक रामचंद्र वामन कोळी, ट्रॅक्टर क्रमांक एमएच. 19. एपी. 8159 वरील चालक नितीन किसन कुंभार , मालक पुनमचंद सुपडू पाटील यांच्याविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.