साक्री । साक्री पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने 39 वे साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन प्रचिती इंग्लिश मेडीयम स्कूल येथे दोन दिवसीय प्रदर्शन शाळेच्या सभागृहात शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांची संयुक्त सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बी.बी.भील होते. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.जे.पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव के.बी नांद्रे, डायटच्या अधिव्याख्यात्या जयश्री पाटील, मुख्याध्यापक एम.एस.गांगुर्डे, आयोजक मुख्याध्यापक अतुल देव, न्यू.इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एम.एम.सुर्यवंशी, जितेंद्र मराठे, विज्ञान मंडळाचे सल्लागार एन.एस.साळुंके, विज्ञान महामंडळाचे सुहास सोनवणे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर, कार्याध्यक्ष एस.आर.बिरारीस, उपाध्यक्ष डी.व्ही.सुर्यवंशी, वाय.ओ.बोरसे, विस्तार अधिकारी व्ही.व्ही.पवार साहेब, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष बी.डी.गांगुर्डे, पी.एम.कदम, एस. के. अहिरराव,राजेश पाटील, आर. सी.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील वर्षाचे प्रदर्शन स्थळ निश्चित
यावर्षी विज्ञान प्रदर्शन 2017-18 चा प्रमुख विषय शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमातून उपविषयांवर चर्चा करण्यात आली आहे. आरोग्य आणि सुद्दुढ आरोग्य , संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, डिजीटल व तांत्रीक समाधान, गणितीय प्रतिकृती . याविषयावर विद्यार्थ्यांनी उपकरणे सादर करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. याशिवाय प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी लोकसंख्या शिक्षण, शै.साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. बैठकीत आयोजन व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुढील वर्षाचे प्रदर्शन स्थळ निश्चित करण्यात आले असुन सन 18-19चे तालुका प्रदर्शन नुतन मराठा विद्यालय छडवेल कोर्डे येथे घेण्याचे निश्चित झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर यांनी प्रदर्शनाविषयी विस्तृत माहीती दिली. गटशिक्षणाधिकारी बी.बी.भील यांनी प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.जे.पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रदर्शन समिती प्रमुख व्ही.जी.एखंडे, विज्ञान संघाचे भटू वाणी,के.एन.माळी, एन.डी.जाधव, ए.एस.पाटील, एस.आर.भदाणे,एच.के.देसले व सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचलन विज्ञान संघाचे सचिव के.एस.बच्छाव यांनी तर आभार उपाध्यक्ष डी.व्ही.सुर्यवंशी यांनी आभार मानले.