जळगाव। नवनियुक्त जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी हे गेल्या दहा दिवसाच्या रजेनंतर जिल्हा परिषदेत हजर झाले आहे. हजर होताच त्यांनी आढावा बैठकीचा सपाटा लावला असून जिल्हा परिषदेत 13 व 14 जून रोजी विविध विभागाच्या कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी 13 रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील 2014-15 व त्यापूर्वीच्या अपूर्ण नळ पाणी पूरवठा योजना, 2015-16 प्रलंबीत उपयोगिता प्रमाणपत्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग लेखापरिक्षण, विभागांतर्गत योजनांचे डॅशबोर्ड संबंधी तर लघुसिंचन विभागातील जलयुक्त शिवार अभियान, विभागांतर्गत योजनांचे डॅशबोर्ड संबंधी कामाकाजांचा आढावा घेण्यात येणार आहे. तर बुधवारी 14 रोजी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील आधार नोंदणी, पटनोंदणी, शाळांचे डिजीटलायझेशन, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम चर्चा, विभागांतर्गत योजनांचे डॅशबोर्ड, सर्वसाधारण बैठकीत शासनाच्या अग्रस्थानी असलेल्या योजना, आस्थापना विषयक बाबी, आपले सरकार सेवा केंद्र विषयी आढावा घेण्यात येणार आहे.