दोन दुकाने फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

0

धुळे । शहराच्या देवपुर भागातील दोन दुकाने फोडून दीड लांखाचे कपडे लंपास केले आहे.साने गुरुजी हौसिंग सोसायटी,मिल परिसर,धुळे येथे राहणार्‍या संजय शिवराम बगदे यांचे देवपुरातील वलवाडी शिवाराच्या राजसारथी कॉलनी परिसरात बगदे मेन्स वेअर हे दुकान आहे. रात्री चोरट्यांनी दुकान फोडले.

दुकानातील 120 जिन्स पॅन्ट, 250 टि शर्ट चोरुन नेले. चोरी गेलेल्या मालाची किंमत दीड लाख रुपये आहे. चोरट्यांनी वलवाडी शिवारातील झेंडा चौकात असलेले साई समर्थ इलेक्ट्रानिक्स हे दुकान देखील फोडले. मात्र या दुकानातून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे वृत्त आहे.