दोन फरार आरोपींना अटक

0
पिंपरी : मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोरवाडी स्मशानभूमी येथे केली. संजय करडे (वय 26), विकास बोटे (वय 20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार हजरत पठाण यांना माहिती मिळाली की भोसरी, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी मोरवाडी स्मशानभूमी येथे थांबले आहेत. त्यानुसार परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समजले. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्यांना भोसरी पोलिसांकडे देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, हजरत पठाण, मयूर वाडकर, संदीप ठाकरे यांच्या पथकाने केली.