दोन फेकूंची कहाणी

0

धंद्यापाण्यात मात्र हे सापनाथ-नागनाथ एक दिसतात. कारण जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण धोरणात दोघे एकच आहेत. उद्योगपतींना मलिदा आणि कामगारांना धोंडा दोघे देत आहेत. सापनाथानी उइख अन् एऊ ला पुढे केले. त्यात सरकारने चौकशीमधून मुख्य आरोपींना दूर ठेवले. टाटा, अंबानी यांचे सर्व गुपित टेप झाले होते. टाटांनी नीरा रादियाला 30 कोटी दिले होते. अंबानीने स्वान कंपनीला पुढे करून त्याने 2 जी स्पेक्ट्रम मिळवला. स्वानमध्ये सर्व पैसे त्याचे होते. पण तुरुंगात दुसरे गेले. पण सापनाथने त्यांना वाचवले. चौकशी व आरोपपत्र मुद्दामहून कमजोर केले. हे न्यायाधीशांनीसुद्धा म्हटले.

गुजरात निवडणुकीने सारा देश ढवळून निघाला. जानवेधारी हिंदूचे नीच राजकारण अय्यरने उघडकीस आणले. त्याचा अर्थ मोदीने नीच जातीचा माणूस करून गुजरात पेटवले. मंदिर पर्यटनने कोण श्रेष्ठ हिंदू आहे हे दाखवण्यासाठी याची स्पर्धा लागली. काँग्रेसला पाक चालवतो की काय? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण करण्यात यश मोदीना मिळाले. या कुठल्याही बाबी शेतकरी-कामगार-सैनिकांशी संबंधित नाहीत. त्या देशाच्या अधोगतीचे राजकारण आहेत. पण ते निवडणुकांचे मुख्य मुद्दे बनवण्यात नागनाथ भाजप नेहमी यशस्वी होतात. धंद्यापाण्यात मात्र हे सापनाथ-नागनाथ एक दिसतात. कारण जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण (खाऊजा) धोरणात दोघे एकच आहेत. उद्योगपतींना मलिदा आणि कामगारांना धोंडा दोघे देत आहेत. आता राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीबद्दल घ्या. मोदीने फ्रान्स भेटीत 2016 ला अंबानीला बरोबर घेऊन राफेल विमानाची खरेदी प्रचंड पैसे जास्त देऊन केली. 48000 कोटींपासून 2012 ते 2015 पर्यंत राफेल विमानाची किंमत 66000 कोटी कशी झाली? खरी किंमत अजून कुणालाच माहीत नाही. संरक्षण मंत्री पर्रीकर अन् इतर सर्वांना डावलून राफेल विमाने विकत घेण्यात आली. हे पूर्ण काम अंबानीच्या मध्यस्थीने झाले.

अनिल अंबानी कधीपासून विमानाचा उत्पादक झाला. राजीव गांधीवर बोफोर्समध्ये खोटे आरोप झाले की कायद्याप्रमाणे भारतात संरक्षणविषयक खरेदीत दलाल मध्यस्थी ठेवता येत नाही. मग राफेलमध्ये अनिल अंबानी कुठून आला. अनिल अंबानी टू जी घोटाळ्याचा मोठा लाभार्थी आहे. आत्ताच कोर्टाचा निकाल आला. त्यात ए राजापासून सर्व आरोपी सुटले. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करायला आदेश दिला. सापनाथानी उइख अन् एऊ ला पुढे केले. त्यात सरकारने चौकशीमधून मुख्य आरोपींना दूर ठेवले. टाटा, अंबानी यांचे सर्व गुपित टेप झाले होते. जगजाहीर होते की टाटांनी नीरा रादियाला 30 कोटी दिले होते. अंबानीने स्वान कंपनीला पुढे करून त्याने 2 जी स्पेक्ट्रम मिळवला. स्वानमध्ये सर्व पैसे त्याचे होते. पण तुरुंगात दुसरे गेले. पण सापनाथने त्यांना वाचवले. चौकशी आणि आरोपपत्र मुद्दामहून कमजोर केले. हे न्यायाधीशांनीसुद्धा म्हटले.

2 जी घोटाळ्यात चार्ज शीटमध्ये अनिल अंबानीचे नाव नाही. पण 3 वरिष्ठ गौतम दोषी, सुरेंद्र पिपर, हरी नय्यर आरोपी आहेत. अनिल अंबानीने स्वान कंपनीला पुढे केले. दुसर्‍या खोट्या कंपन्या जशा पोपट, झेब्रा, चित्ता यांना पुढे केले. त्यात त्याचा कंपन्यांचा पैसा घातला तरी सापनाथ काँग्रेस सरकारनी त्याच्यावर कारवाई केली नाही, म्हणून आरोपी सुटले. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन मी काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू आहे. त्याचा जुळाभाऊ नागनाथ आहे. अचानक राहुल गांधींना आणि सापनाथला मीडियामध्ये चांगले ठरवण्याचा सपाटा चालू झाला आहे. कारण नागनाथ पुढची निवडणूक हरणार आहेत. गुजरात निवडणुकीत मथळे आले की पराभवातदेखील सापनाथ जिंकले. खरी गोष्ट ही आहे की सापनाथ काँग्रेस/राष्ट्रवादी हा चोरांचा आणि दलालांचा पक्ष झाला. सापनाथ काँग्रेस भाजपशी टक्कर घेऊच शकत नाही. मग आता नागनाथांशी लढणार कोण? दिल्लीत फिरलो काम बघितले. शाहू महाराजानंतर केजरीवालने पहिल्यांदाच विक्रम घडवला. 26% बजेटचा हिस्सा त्याने शिक्षणासाठी लावला. सरकारी शाळांना पंचतारांकित केले. सरकारी शाळेत पोहण्याचा तलाव, स्टेडीयम देशात कुठेच नाहीत. लोक आता खासगी शाळांऐवजी सरकारी शाळेत जाणे पसंद करतात.

पाणी फुकट केले तरी दिल्ली जल बोर्ड फायद्यात आहे. अर्थसंकल्पाच्या 13% आरोग्यावर खर्च केले. सर्वांना आरोग्य मोफत केले. अगदी पंचतारांकित दवाखान्यात सामान्य माणसाचा इलाज होतो. सर्वात स्वस्त वीज दिल्लीत आहे. तरी दिल्ली विद्युतबोर्ड फायद्यात आहे. अशी अनेक कामे बघितल्यानंतर मला विश्‍वास वाटला की भय, भूक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध एक आदर्श सरकार दिल्लीत काम करत आहे. मी केजरीवालना भेटलो अनेक विषयांवर चर्चा केली, मग सावित्रीबाई फुले आणि जिजामाता जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात यावे, असे निमंत्रण दिले. त्यांनीही लगेच होकार दिला व आता 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे सावित्रीबाई फुले आणि जिजाई माताना वंदन करण्यासाठीही ते येणार आहेत. मी त्यांना म्हटले की तुम्ही इतके चांगले काम दिल्लीत करत आहात तर महाराष्ट्रात तुम्ही का करत नाहीत? त्यांनी लगेच येथे काम करण्याला होकार दिला व जिजामातेचा आशीर्वाद घेऊन 12 जानेवारीला महाराष्ट्रात सापनाथ नागनाथांना अरबी समुद्रात गाढण्यासाठी व नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी अरविंद केजरीवाल येत आहेत. तरी सर्व देश भक्तांनी त्यांचे जोरदार स्वागत करावे ही विनंती करत आहे. मी स्वत: केजरीवाल यांना पूर्ण साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929