अमळनेर । तालुक्यातील दहिवद येथे गोपिका नदीवर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने 4 सिमेंट बंधार्याचे काम पूर्णत्वास आले असून अजून दोन बंधार्यांचे भूमिपूजन नुकतेच आमदार चौधरी यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर बंधार्यामुळे दहिवद परिसरातील सुमारे दीडशे ते दोनशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी शासन व हिरा उद्योग समूह यांच्या सहयोगाने ‘गाव तेथे जलयुक्त शिवार’ हि संकल्पना राबवून नालाखोलीकरणातून अनेक गावे जलमय केली आहेत. यासाठी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने या अभियानास बळकटी मिळून जलयुक्त शिवारमध्ये अमळनेर तालुका आघाडीवर आहे.
नव्याने दोन बंधारे आमदारांकडून मंजूर
दहिवद येथे गोपिका नदीवर एकही बंधारा नसल्याने सर्व पाणी वाहून जाऊन दहिवद परिसर कोरडाठोक झाला होता. यांची माहिती आमदारांनी घेतल्यानंतर त्यांनी दहिवद परिसर जलमय करण्याचा शब्द गावकर्यांना दिला होता व यानुसार जलयुक्त शिवार अंतर्गत सुरवातीला प्रत्येकी 9 लाख निधीतून चार सिमेंट बंधारे मंजूर करून नुकतेच चारही बंधार्यांचे काम पूर्ण होऊन या निधीतून नदी खोलीकरणही करण्यात आले आहे. तसेच या बंधार्यांच्या पुढे अजून प्रत्येकी 9 लाख निधीतून दोन बंधारे आमदारांनी यांनी मंजूर केले आहेत.
पूर्ण झालेल्या बंधार्यांची आमदार चौधरी यांनी नुकतीच पाहणी करून नव्या बंधार्यांचे भूमिपूजन करण्यात आले. सदरचे काम कृषी विभागाचे सहायक योगेश वंजारी यांचे देखरेखीखाली सुरु असून काम गुणवत्तेत करण्याची ग्वाही त्यांनी आमदार चौधरी यांना दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रा.अशोक पवार, गटनेते न.पा. प्रवीण पाठक, राजीव पाटील, सुनील भामरे, आनंदसिंग पाटील, तालुका कृषी अधिकारी भटू पाटील, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, कृषी सहाय्यक डी.बी. पाटील, कृषी सहाय्यक ए.जे. सूर्यवंशी, पंकज पाटील, भिला माळी, बापू पाटील, सुकलाल पाळधी, जगन्नाथ पाटील, भगवान वाघ यांची उपस्थिती होती
उद्घाटन प्रसंगी यांची उपस्थिती
मच्छीद्र ट्रेलर, राजेंद्र पाटील, दत्तू पाटील, भालेराव पाटील, योगेश पाटील, प्रवीण महाजन, प्रशांत भदाणे, बापू सोनवणे, गोकुळ महाजन, शिवाजी पाळधी, सुरेश महाले, निलेश पवार, दगडू माळी, संजय पाटील, मगन भिल, स्वप्नील सोनवणे, गब्बर पाटील, मधुकर पाटील, संजय महाजन, शालीक सोनवणे, गणेश माळी, प्रदीप पाटील, संतोष कुंभार, दीपक सोनवणे, खंडेराव धनगर, आधार माळी, शांताराम पाटील, ईश्वर माळी, नाना माळी, दगडू माळी, ज्ञानेश्वर जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.