दोन बसचालकांकडून 20 लाखांची दारू जप्त

0

गडचिरोली । जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी असतानाही चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. सलीम शेख आणि उमेश पदा अशी अटक करण्यात आलेल्या बसचालकांची नावे असून 20 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात दारू बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, चोरट्या मार्गाने नागपूरवरुन येणार्‍या राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून दारूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना समजले.