दोन बहिणींचा विनयभंग; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

0

शिदखेडा । तालुक्यातील नवी आच्छी येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत मुलीने शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. तीन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवी आच्छी येथे महिलांच्या शौचालयाकडे जाणा-या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी संगनमत करून चौदा वर्षीय दोन्ही बहिणींची छेडछाड केली. दोन्ही बहिणी शौचालयाकडून परतत असतांना आरोपी सूरज भिल व करण भिल यांनी तरूणींना लज्जा येईल असे कृत्य केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.तसेच आरोपी पिडीत मुलींच्या घराकडे येत, पाठलाग करत व वाईट नजरेने पाहत असल्याचे म्हटले आहे.अप्पु उर्फ सूरज भिल, विजय कैलास भिल, करण शिवदास भिल यांच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज करीत आहेत.