दोन महिन्यांपुर्वी चोरीस गेलेल्या पाईपांसह दोघांना अटक

0

जामनेर। तालूक्यातील गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्टीज कंपनी(पाईप फॅक्टरी) येथुन मे महीन्यात बेंगलोर येथे माल पोहचविण्यासाठी निघालेला ट्रक तिथे न पोहचता ध्येच गहाळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर गहाळ झालेले पाईप हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात जामनेर पोलीसांना यश आले आहे. जामनेर तालूक्यातील सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनी मधून 1 मे 2017 रोजी चालक शेख शकीब नुर मोहम्मद (रा.भोकरदन जि. जालना) हा त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीच्या ट्रक नंबर एम एच 21एक्स 8365 मध्ये साडेसहा लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया आकाराचे 1250 नग पि.व्ही.सी.पाईप भरून बेंगलोर येथे पोहचविण्यासाठी निघाला होता

दोघांकडून 800 पाईप हस्तगत
परंतु तो तेथे पोहचला नसल्यामुळे सदर कंपनीने त्याची व गाडीची शोधाशोध केली असता. तो कुठेही आढळून न आल्यामुळे शेवटी 22 मे रोजी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखला करण्यात आला होता. तेव्हापासून जामनेर पोलीस संबधीत चालकाच्या शोधात होते. सुमारे अडीच महीन्यानंतर मिळालेल्या गुप्त माहीतीवरून चालक शेख शकीब नुर मोहम्मद पोलीसांनी ताब्यात घेवून आपली खाकी दाखविल्यानंतर त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालूक्यातील परिसरात अस्लम बेग मिर्झा (रा.सिल्लोड जि.औरंगाबाद) याला विकल्याचे कबुल केले.