दोन महिलांसह एका मुलीचा मृत्यू मात्र तीनही कोरोना संशयित रुग्ण नाही

0

खबरदारी म्हणून तिघांचेही नमुने तपासणीसाठी घेतले

जळगाव – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी कोरोना संशयित तीन महिला रुग्णांचा सायंकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर अाली आहे. तिन्ही महिला करून संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल नव्हत्या मात्र खबरदारी म्हणून तिघांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती डॉक्टर भास्कर खैरे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली .

तिघांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दोन महिलांसह दहा वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या तीनही जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतरच या तीनही जणांच्या मृत्यूबाबत खुलासा होणार आहे.

अशी आहे तिघांच्या मृत्यूची माहिती

या तीन पैकी २ महिला वृध्द असून एक १० वर्षाची मुलगी आहे.

१ पहिली महिला तिचा मृत्यू झाला तिला स्तन कॅन्सर होता ती खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती यादरम्यान मृत्यु झाला.

२ दुसरी दहा वर्षांची मुलगी असून तिचाही खासगी रुग्णालयात उपचार मृत झाला मृत्यूनंतर तिचा मृतदेह शवविच्छेनासाठी जिल्हा रुग्णायलात पाठविण्यात आला. शासनाच्या गाइडलाइन नुसार तिचे शवविच्छेदन न करता नातेवाईकांची समजुत घालती व तिचे नमुने तपासणीस घेण्यात आले.

३ तिसऱ्या क्रमांकाच्या ६० वर्षीय रुग्ण महिलेला श्वास घेण्यास अडचणी होत्या . तिला गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तिचा मृत्यू झाला .

तिन्ही पैकी कुणीही कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल नव्हत अशी डॉ. भास्कर खैरे यांनी बोलतांना दिली. खबरदारी म्हणून तिघांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.