खडकी : दसर्याच्या दिवशी सोने खरेदीच्या बहाण्याने येथिल एका सराफाच्या दुकानातील 41 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोन महिला चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शबाना बेगम, (वय 27) व रिजवान (मुन्नी बेगम) अबुल हकीम शेख (वय 30 दोघी रा.सुभाष नगर) या दोघींना अटक करण्यात आली आहे. विनोद राठोड (वय 38 रा.बोपोडी) या दुकान मालकाने फिर्याद दाखल केली.
हे देखील वाचा
राठोड ज्वेलर्स या दुकानात दसर्याचा सणामुळे गर्दी होती. त्याचा फायदा घेत आरोपी महिला सय्यद व शेख या दोघींनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातील 14 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व 27 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेटची चोरी केली. त्याच प्रकारचे बेंनटेक्सचे बनावट दागिने ठेऊन आम्ही परत येतो, असे सांगुन पळ काढला. राठोड यांना संशय आला त्यांनी दोघींचा पाठलाग केला. दुकानाच्या बाहेर काही अंतरावर योगायोगाने गस्त घालणारी पोलिसांची जीप उभी होती. महिला पोलिस उप निरिक्षिका कांबळे यांना राठोड यांनी हा प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांना महिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता चोरी केलेले दागिने सापडले.