दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

0

जळगाव – तांबापूरा भागात राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलांसह घरात कुणालाही काहीही एक न सांगता घरातून निघून गेल्याची घटन 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 नंतर घडली असून पतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात तिघांबाबत हरविल्याची नोंद करण्‍यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शबनमबी शेख शफिक शेख (वय-22) रा. मच्छीनगर, तांबापूरा ह्या मुलगी आशीया शेख शफिक शेख (वय-4) आणि मुलगा नुरमहम्मद शेख शफीक (दीड वर्ष) यांना सोबत घेवून 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना आणि कुणालाही काहीही एक न सांगता घरातून निघून गेले. त्यांचा नातेवाईक आणि माहिरी संपर्क करून तपास केला मात्र त्या तेथेही आढळून आल्या नाही. त्यांचे पती शफिक शेख शब्बीर शेख (वय-24) यांच्या खबरीवरून पत्नी शबनमबी शेख शफिक शेख, मुलगी आशीया शेख शफिक शेख आणि नुरमहम्मद शेख शफीक यांची एमआयडीसी पोलीसात 101/2018 प्रमाणे तिघांची हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.