जळगाव – वडीलांकडे राहण्यासाठी आलेली विवाहिता दोन मुलींसह बाजारा जावून कपडे खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सागुन घरून गेल्या असता अद्यापपर्यंत घरी न आल्याने वडीलांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामसिंग बध्धू जाधव (वय-50) रा. प्लॉट नंबर 6, डॉ. प्रकाश भंगाळे यांचे हॉस्पिटल हे हॉस्पिटलमध्ये वाचमन म्हणून कामाला आहे. त्यांची मुलगी कमलाबाई दिलीप चव्हाण या आपल्या पती दिलीप रोहिदास चव्हाण रा. लालमाती रा.रावेर हे जळगावला कामनिमित दोन मुलींसह वडील रामसिंग जावध यांच्याकडे 23 सप्टेंबर 2018 रोजी आल्या होत्या. 07 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कमलबाई चव्हाण या आपल्या मुली अंजू (वय-3) व मंजू (वय-4) यांना घेवून बाजारात जावून कपडे खरेदी करण्यासाठी सांगून गेले. मात्र त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नसल्याने वडील जाधव यांनी शोधाशोध सुरू केली. तिघे मिळून न आल्याने रामसिंग जाधव यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढीत तपास पोहेकॉ श्री. इंद्रकर करीत आहे.