दोन रिक्षाचालकांमध्ये शुल्लक कारणावरून हाणामारी

0

जळगाव- रामानंद नगरच्या घाटावर शुक्रवारी 5.15 वाजेच्या सुमारास दोन रिक्षाचालकांमध्ये शुल्लक कारणावरून तुंब्बळ हाणामारी झाली. त्यामुळे या नागमोडी उतरतीवर पंधरा मिनीट वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, दिवसेंदिवस रिक्षा चालकांचा मूजोरा वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील बेशिस्त रिक्षाचालक तसेच शुल्लक कारणावरून वाद घालणारे रिक्षाचालकांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आज सांयकाळी सव्वापाचला रामानंद नगर उतरतीवर दोन रिक्षा चढताना एकमेकांना कट लागून एका रिक्षातील प्रवासी महिलेचा हाताला खर्चटल्याने वाद झाला. रस्त्याच्या मधोमध दोन्ही रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पंधरा मिनिटे हा वाद सुरू होताच. रस्त्यावरून येणारे जाणारे वाहनधारक काय वाद सुरू आहे हे पाहण्यासाठी थांबत असल्याने या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतुकीची कोंडी झाली होती. शाळा सुटण्याच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे या मार्गावरून स्कूल बस, स्कूल व्हॅन, रिक्षा यांना पंधरा मिनीटांनी वाहतुकीच्या कोंडीत सापडले होते.

कारवाईची मागणी
हरिविठ्ठल नगर मार्गावर चालणार्‍या रिक्षाचालकांचा प्रवाशा सोबत वाद, तसेच भरधाव वेगाने इतर वाहनांच्या अंगावर वाहने घेवून जाणे तसेच शुल्लक कारणावरून वाद घालण्याचा प्रकार वाढलेले आहे. मागील एक-दोन महिन्यापूर्वी एका वृद्ध प्रवाशाला पैसे देण्याच्या वादातून रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे हरिविठ्ठल नगर, वाघ नगरच्या स्टॉपवरील दांडशाही पणा करणार्‍या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्कूल बस अडकल्या
सव्वापाचला घडलेल्या रिक्षाचालकांच्या हाणामारी ही भररस्त्यात सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक जमा झाली. त्यात शाळा सुटलेली असल्याने विवेकानंद शाळेच्या स्कूलबस, एटी झांबरे, भगीरथ शाळेच्या स्कूल व्हॅन या अडकल्या होत्या.