दोन लाखांची फसवणूक

0

पुणे । खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना फेब्रुवारी ते ऑगस्ट 2017 या कालावधीत घडली. याप्रकरणी श्रध्दा गाढे (वय 25, रा. कर्वेनगर) हिने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चेतन सागर कानकेकर आणि दोन अन्य इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानेकर आणि त्याच्या साथीदारांनी श्रध्दा यांच्याशी फोनवरून आणि ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत नामांकीत खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून 2 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक खांडेकर अधिक तपास करीत आहेत.