दोन लाखांची रोकड लांबवली : जळगाव गुन्हे शाखेने आवळल्या दोघांच्या मुसक्या

जळगाव : दोन लाखांची रोकड लांबवल्याप्रकरणी भडगाव पोलिसात दाखत असलेल्या गुन्ह्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 20 हजारांची रोकड जप्त केली आहे. चालक विशाल उर्फ नाना संजय तेली (22, तेली गल्ली, पिंपळगाव हरेश्वर) व सागर संजय पाटील (20, पिंपळगाव हरेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर शाहरुख तडवी (कोल्हे, ता.पाचोरा) पसार झाला आहे.

वाहनातून लांबवली होती दोन लाखांची रोकड
व्यापारी भिकन आनंदा पाटील (सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) हे भुईमूगाच्या शेंगाची खरेदी करून ते विक्रीसाठी धुळ्यातील सागर इंण्डस्ट्रीज 11 मे रोजी टेम्पो (एम.एच.05 एस.2699) ने गेले होते. धुळ्यात शेंगा विक्री केल्यानंतर दोन सहा हजार सहाशे रुपयांची रोकड बॅगेत ठेवून परतीच्या प्रवासात असताना भडगाव शहरातील आयटीआय कॉलेजजवळ रात्री 7.45 वाजता वाहन पंक्चर झाले व चाक बदलत असताना दुचाकीवरून तिघे आले व त्यांनी मदत करण्यास हातभार लावताच एक हाताला लागले असल्याने बाजूला सरकला दुसरा मदत करताना आरोपींनी वाहनात ठेवलेली बॅग काढून दुचाकीवरून पोबारा केला होता. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अशोक महाजन, सहा.फौजदार शरीफ काझी नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल रणजीत जाधव, हवालदार राजेंद्र पवार यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व लांबवलेल्या रकमेपैकी 20 हजारांची रोकड काढून दिली. आरोपींना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.