अक्कलकुवा । खापर- कोराई रस्त्यावर रोडला लागून अनोपचंद खुशालचंद याचे घर आहे. दुपारी बोथरा हे ओट्यावर उभे असतांना दोन अनोळखी इसम आकाशी रंगाच्या बजाज पल्सर मोटेरसायक- लने आले, आमच्याकडे चांगल्याप्रकारचे प्रॉडक्ट आहेत बघून घ्या, असे सांगत पाणी प्यायला द्या म्हणत घरात आलेत, घरात आल्यावर कोमल बोथरा यांना गरम पाणी, हळद आणा असे सांगून हाताला विशिष्ट पावडर लावून सौ. बोथरा यांना गुंगीत आणून काही कळायचा आतच हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन आलेल्या मोटरसायकलने पसार झालेत, आरडाओरड करून पकडण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोर पसार झालेत. अक्कलकुवा पोलीसात दोन अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.