दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

फैजपूर : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर घेण्यासाठी पैसे न आल्याने छळ
फैजपूर शहरातील इस्लामपूरा येथील माहेर असलेल्या आसमाबी अझरोद्दिन शेख (28) यांचा विवाह भुसावळ येथील अझरोद्दीन रईसोद्दिन शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार 2017 मध्ये झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर पती अझरोद्दीन शेख याने विवाहितेला माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रूपये आणावे, अशी मागणी केली. परंततु आई-वडीलांची परीस्थिती नाजूक असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकल्या नाही. याचा राग आल्याने पती अझरोद्दीन याने विवाहितेला शिविगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सासू, सासरे, दिर, मोठी नणंद यांनी गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता बाहेरी निघून आल्या. शनिवार 19 फेब्रुवारी रोजी विवाहितेन फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अझरोद्दीन रईसोद्दिन शेख, सासून रजीयाबी रईसोद्दीन शेख, रईसोद्दिन अमरोद्दिन शेख, मोहंमद रइसोद्दिन शेख (सर्व रा. भुसावळ), सिरीनबी ईस्माईल शेख, आणि नसरिनबी जुबेर शेख (रा. जामनेर) यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमजद खान
पठाण करीत आहे.