चाकण : दोन चिमुकल्या लेकरांना घरात सोडून कोणाला काही न सांगता चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडी (ता. खेड) येथून चोवीस वर्षीय लेकुरवाळी गेल्या चार दिवसांपासून निघून गेली आहे. संबंधित विवाहिता बेपत्ता असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पोलिस हवालदार नामदेव जाधव यांनी दिली. अश्विनी उर्फ आशाबाई लखन म्हस्के (वय – 24 वर्षे, सध्या – रा. कडाचीवाडी, ता. खेड, मूळ रा. पाडीपारगाव, ता. धारूर, जि. बीड) असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिचा पती लखन नवनाथ म्हस्के (वय – 27 वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अश्विनी ही कडाचीवाडी (ता. खेड ) येथे तिचा पती, दोन लहान मुले, सासू व दीर यांच्यासमवेत राहत आहे. अश्विनी 7 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कडाचीवाडी येथून दोन चिमुकल्या लेकरांना सोडून निघून गेली आहे. विवाहितेबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी चाकण पोलिस ठाण्याशी संपर्क (फोन नं. 02135 – 249333) साधण्याचे आवाहन गिरीगोसावी केले आहे.