दोंडाईचा । शेतकर्यांनी 2005 पासुन वीज कनेक्शनसाठी अर्ज केले. मात्र त्यांना मागील सरकारने वीज कनेक्शन दिले नाही. आम्ही गाव पाड्यापर्यंत वीज पोहचवित असुन 170 कोटी रूपये खर्च करून 26 उपकेंद्र धुळे जिल्हात दिले. तर सन 2030 पर्यंत 430 कोटी रूपये या भागात खर्च करणार आहोत. आज मालपूर उपकेंद्राचे भुमिपूजन केले असुन 26 जानेवारीला उद्घाटन करू यानंतर मालपूर गावाला 24 तास वीज मिळेल अशी ग्वाही उर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालपूर येथे दिली. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने पायाभूत योजना 2 अंतर्गत प्रस्तावीत असलेल्या 33/11 के.व्ही. मालपूर उपकेंद्राचा भुमिपूजन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार रावल होते. तर व्यासपीठावर ओम प्रकाश बकोरीया, ब्रिजपालसिंह जनवीर, राजश्री पानपाटील, महावीरसिंह रावल, बबन चौधरी, कामराज निकम, नरेंद्र गिरासे, शांतीलाल गोसावी आदि उपस्थित होते.
सौर ऊर्जा प्रकल्प उभारू
श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, मागील 40 वर्षांत झाले नाही ते काम आम्ही पुढच्या दहा वर्षात करणार आहोत. सुमारे 3500 शेतकर्यांना मालपूर उपकेंद्रातुन वीज मिळणार आहे. तसेच दोंडाईचा येथील सौर उर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. 500 ते 1000 शेतकर्यांना एकत्र आणुन शेतातच सौर उर्जा प्रकल्प उभारून 12 तास वीज उपलब्ध करून देवू तसेच मुख्यमंत्री कृषी वाहीनी योजना आणुन 12 तास वीज उपलब्ध करून देणार आहोत.
अनेक दिवसांचे स्वप्न साकार
यावेळी बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुराव्याने हे काम मालपूर वासियांना मिळाले. आपल्याला लढवय्या लोकप्रतिनिधी मिळाला आहे. यावेळी जयकुमार रावल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनात सांगितले की, आज मालपूर वासियांसाठी सोन्याचा दिवस उगवला असुन अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले. मालपूर परिसरात पाणी भरपूर पण पाणी उचलायला वीज नाही. पण आता वीज आली आहे. येणार्या वर्ष दीड वर्षात काम पुर्ण होणार आहे.
सात बारा कोरा करणार
70 वर्षांच्या राजवटीत भाजपाचा मंत्री गावपाड्यात पोहचला असुन सुमारे दोनशे कोटीचा विकास विधी दिला. पाणी वीज आल्याने पुढचा काळ सुखाचा आहे. शेतकर्यांचा सात बारा सुध्दा लवकर कोरा होणार आहे. रोहयोच्या माध्यमातुन राज्यात 1 लाख 25000 हजार विहीरीचे काम पुर्ण केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार डी.एस.गिरासे यांनी केले.