दोन विद्यार्थ्यांचा नंदुरबारजवळील विरचक धरणात बुडाल्याने मृत्यू

नंदुरबार : शहरातील जिजामाता विद्यालयातील मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांचा शहरापासून काही अंतरावरील विरचक धरणात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक सुनील वाकडे व कल्पेश भगवान सोनवणे अशी मयतांची नावे असल्याचे समजते.

पेपर संपताच मृत्यूनेही गाठले
गुरुवारी मुक्त विद्यापीठाचा अखेरचा पेपर असल्याने पेपर संताप सुमारे आठ विद्यार्थी असलेले मित्र शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील विरचक धरणात पोहण्यासाठी गेले होते. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असलातरी मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे दोन विद्यार्थी गाळात रूतल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या घटनेनंतर सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.