दोन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

0

जळगाव। पारोळा तालुक्यातील रत्नपिप्री येथील विद्यार्थी मयुर पाटील व अक्षय मराठे यांनी पोहण्यासाठी शेळावे खु येथील चिखली नदीपात्रात उड्या मारल्या.असता पाण्याखाली गाळ साचलेला असल्याने दोन्ही मुले नदीपात्रात अडकून त्यांचा मृत्यू झाला.

ते यशंवत माध्यमिक विद्यालयात शिकत होतेे. दोघा मुलांच्या नातेवाईक व कुटूंबीयांनी घटनास्थळी व कुटीर रूग्णालयात धाव घेतली.पारोळा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.