रावेर: तालुक्यातील आदिवासी भागातील पिंपरकुंड येथील दोन भावांचा मृत्यू लालमाती आश्रम शाळेत झाला होता. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून, परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्युनंतर आदिवासी प्रकल्प विभाग खळबळून जागे झाले असून या ठिकाणी आरोग्य कॅम्प लावणार आहे.
येथील लालमाती आश्रम शाळेत इयत्ता पहीलीत शिक्षण घेणाऱ्या राकेश जगन बारेला व आकाश जगन बारेला वय ६ यांना त्यांचा मोठा भाऊ ५ रोजी शाळेतून घरी घेवून गेले होते. ८ रोजी मयत राकेश बारेला याला उलटी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून घरी गेल्या नंतर ११ रोजी त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा दुसरा भाऊ आकाश बारेला याच्या पोट १८ रोजी दुखायला लागले. आश्रम शाळेतील शिक्षकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले, पुढील उपचारासाठी जळगाव गोदावरी हॉपिस्टल मधून औरंगाबादला जातांना मृत्यू झाला. याबाबत रावेर तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये एकच खळबळ उडाली आहे
मुलांचा मृत्यू घरी शाळेचा दोष नाही: मुख्याध्यापक
दोघे मयत मुले लालमाती आश्रम शाळेत इयत्ता पहीलीत शिक्षण घेत होते त्यांचे नातेवाईक आले व आम्हाला आमची मुले घरी पिंपरकुंड येथे घेऊन जायचे आहे असे सांगून ते घेऊन गेले. त्या नंतर दोघां पैकी एकाचा मृत्यू झाला, तसेच त्याचा दुसऱ्या भावाच्या पोटात दुखायला लागल्याने त्यांना आम्ही रावेरला आणले व पुढे त्याच्या उपचारार्थ नेत असतांना मृत्यू झाला. हा सर्व प्रकार त्यांच्या घरी झाला असून आश्रम शाळेचा यात काहीही दोष नसल्याचे लालमाती आश्रम शाळेचे मुख्यध्यापक मनिष तडवी यांनी जनशक्तीशी बोलतांना सांगितले
आश्रम शाळेत आरोग्य कॅम्प
आज पासुन लालमाती आश्रम शाळेत आरोग्य कॅम्प लावण्यात येणार असून, शाळेतील सर्व विद्यार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी सांगितले