दोन वेळा बिले काढलेली नाही; निविदा प्रक्रियेत प्रशासनाची चूक-मुख्याधिकारी

0

नंदुरबार। छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील खुर्च्या बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारची दोन बिले काढण्यात आलेली नाही, केवळ तांत्रिक कारणामुळे दुसऱ्या निविदेत प्रशासनाची चूक झाली होती, ती देखील दुरुस्ती करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण नगरपालिकेचे मुख्यधिकारी गणेश गिरी यांनी केले. त्यामुळे नाट्यमंदिर खुर्च्या बिलांच्या कथित प्रकरणावर पडदा पडला आहे.

खुर्च्या बदलण्यासाठी नगरपालिकेने दोन वेळा निविदा काढून दीड कोटींचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे डॉ. रविंद्र चौधरी यांनी केला होता. त्याला उत्तर म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खुलासा केला होता. मात्र नागरिकांच्या मनात या प्रकरणाची संभ्रमावस्था होती. खरे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मुख्यधिकारी गणेश गिरी यांची भेट घेतली असता. त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. दोन वेळा कोणत्याही प्रकारची बिल काढली नाहीत,मात्र दोन वेळा निविदा काढण्यात आली, त्यात खुर्च्यांचा उल्लेख झाल्याने शब्दांचा वाद सुरू झाला, असे नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.