दोन सराईत गुन्हेगारांना अटक

0

भोसरी : एमआयडीसी भोसरी ठाण्यातील तडीपार तर भोसरी ठाण्यातील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अशा दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी भोसरी परिसरात केली. चाँद गफूर शेख (वय 25, भोसरी) आणि शुभम उर्फ दाद्या माने (वय 20, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. तो तडीपार असूनही शहरात फिरत असल्याची खबर पोलीस कर्मचारी सागर शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. तडीपार कालावधीत पुणे जिल्ह्यात येण्याबाबत परवानगी आहे का, असे विचारले असता त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. दुसर्‍या कामगिरीमध्ये कर्मचारी नितीन खेसे यांना खबर मिळाली की, भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरारी आरोपी माने हा शास्त्री चौक येथे आला आहे. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या मानेने गुन्हा काबुल कल्याने त्यास अटक करून.