दोन हजारांच्या नोटांमुळे भ्रष्टाचार वाढेल : बाबा रामदेव

0

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयासाठी मोदी सरकारला खुला पाठींबा देणारे बाबा रामदेव आता दोन हजाराच्या नोटांच्याविरोधात उभे राहिले आहेत. बाबा रामदेव म्हणाले, दोन हजारांच्या नोटा अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार वाढेल. दोन हजाराच्या नोटांमुळे लाच घेणे व देणे सोपे झाले आहे.

परदेशात असलेला काळापैसा देखील भारतात आणला पाहिजे. पण, मोदी सरकारला आता दोनच वर्षे झाली आहेत. मोदी सरकार हे काम नक्की करेल.