जळगाव – तक्रारदार याला कामावरून काढल्यानंतर राहिलेला पगाराचा धनादेश काढल्याच्या बदल्यात तक्रारदारकडून दोन हजार रूपयाची लाचेची मागणी करणाऱ्या चोपडा परीक्षेत्रातील वनपाल यास लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल विजय जिजाबराव तेले (वय-39) रा. थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे असे असे संशयित आरोपीचे नाव आहे.