मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर : रात्री आठ वाजेपर्यंत चालली आढावा बैठक
रावेर (प्रतिनिधी) :- खिरवडच्या ग्राम सेवकांनी केलेला सुमारे सतरा लाखाचा भ्रष्ट्राचार प्रकरणात निलंबनाची कारवाई झाली आहे या संदर्भात पुढील वस्तुनिष्ठ अहवाल मागितलेला आहे त्यात दोषी आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल अशी माहीती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. जलयुक्त शिवार,अपूर्ण राहीलेले घरकुल,वृक्ष लागवड,मनरेगा,१४ वित्त आयोगाच्या निधी यासह इतर झेडपी योजनां संर्दभात आढावा बैठक घेण्यात आलीे त्यात अपुर्ण असलेल्या योजना बद्दल ग्रामसेवकांची चांगलीच झाडाझळती केेली ही बैठक रात्री साडे सात पर्यंत सुरु होती यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी हबीब तडवी विस्तार अधिकारी डी. एस.सोनवणे, सी.आर. महाले, गटशिक्षणधिकारी विजय पवार, तालुक्यातील सर्व ग्राम सेवक कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सीईओच्या धास्तीने कर्मचा-यांची उपस्थिती
पंचायत समिती कार्यालयात नेहमी अधिकारी कर्मचा-यांचा शुक-शुकाट राहत होता. परंतु आजच्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीला खुद्द जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर येणार असल्याने ऑफिसला सकाळ पासूनच कर्मचा-यांनी उपस्थित होते.