दोषी नगरसेवकांना आज वसुली नोटीस

0

जळगाव : शहरातील महापालिकेच्या घरकुल आणि मोफत बससेवा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी शंभर नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाख 32 हजार 911 रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी 28 नगरसेवकांची याचिका न्यामयूर्ती टी. व्ही. नलवडे यांनी 23 डिसेंबरला फेटाळून लावलेली आहे.

आयुक्तांनी दिले आदेश
जळगाव महापालिकेच्या मोफत घरकुल योजना आणि मोफत बससेवेतील दोषी नगरसेवकांकडून प्रत्येकी घरकूल प्रकरणी 1 कोटी 16 लाख तसेच बससेवेतील नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाख 32 हजार 911 रूपये वसूल करण्यासंदर्भात आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंगळवारी आदेश दिले आहेत. यात विद्यमान 7 नगरसेवकांचा समावेश आहे. 2013 मध्ये ज्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारल्या होत्या त्यांना स्मरणपत्र देण्यात येणार आहे. तर ज्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारली नव्हीती त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. बांधकाम व नगरसचिव कार्यालयाचे कर्मचारी या नोटीस व स्मरणपत्रांचे वाटप बुधवारपासून करणार आहेत. जे दोषी नगरसेवक नोटीस स्वीकारणार नाहीत त्यांच्या घरावर नोटीस किंवा स्मरणपत्र डकविण्यच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच जे नगरसेवक रक्कम निर्धारीत रक्कम भरू शकणार नाहीत त्यासंदर्भात विधीतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.