दौंडमधून 9 जण तडिपार

0

दौंड । गणेशोत्सव आणि बकरी ईद काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दौंड पोलिस स्थानकांतर्गत 9 जणांवर हद्दपारची कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. गणेशोत्सव आणि बकरी ईद सणाच्या कालावधीत शांतता राहावी, या अनुषंगाने व्यंकटेश राठोड (रा. सोनवडी), शंकर चव्हाण (रा. सोनवडी), अमर परदेशी (रा. मलठण), संजय गुन्नर (रा. खोरवडी) तर सीआरपीसी 144 (3) प्रमाणे शाहरुख कुरेशी, दत्ता काची, अजीमसय्यद, अरबाज कुरेशी, आसिफ कुरेशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आले. त्यांना 5 सप्टेंबर पर्यंत दौंडमधून तडिपार करण्यात आले.