मुंबई । यंदाच्या पावसळ्यात सातत्यपूर्ण कमागिरी करणार्या पालघरच्या द्यानेश्वर मोघराने अवघ्या महिनाभराच्या कालवधीत सलग चौथी अर्धमेरेथॉन स्पर्धा जिंकून एका वेगळ्या विक्रमाची दिशेने आगेकूच केली आहे. रविवारी सकाळी लवकर झालेल्या 21 किलोमीटर अंतराच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये द्यानेश्वरने 1 तास 9 मिनीटे 5 सेकंद अशी वेळ नोंदवून आयडिबीआय फेडरल लाईफ इंशुरन्स स्पर्धेतील पुरूषाच्या गटात बाजी मारली. या शर्यतीत द्यानेश्वर दुसर्या क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या जगमल रामचंदरने तब्बल पाच मिनीटांच्या फरकाने मागे टाकले. जगमलने ही शर्यत 1 तास 14 मिनीटे 24 सेकंदात पूर्ण केली. तिसर्या स्थानावर राहिलेल्या सुभाषचंद्रने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 1 तास 15 मिनीटे 47 सेकंद एवढा वेळ घेतला.
पुरूषांच्या 10 किलोमीटरच्या अंतराच्या शर्यतीत चांगली चुरस पहायला मिळाली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने तिघा विजेत्यांनी यश मिळवले. अमितने ही शर्यत 32 मिनीटे 11 सेकंदात पूर्ण केली. त्यापाठोपाठ प्रमोदकुमारने 32 मिनीटे 14 सेकंद आणि सूरज यादवने 32 मिनीटे 46 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. या गटातील महिलांची शर्यत पूनम सिंगने 39 मिनीटे 15 सेकंदात पूर्ण करत अव्वल क्रमांक मिळवला. गीता वाथगुरे ( 40 मिनीटे) आणि चंद्रावती राजवाडे (41मिनीटे 32 सेकंद) अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर राहिल्या. दुसर्या आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्धमॅरेथॉनाला वांद्रे कुर्ला संकुल येथील आर 2 ग्राऊंड येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अर्धमॅरेथॉन स्पर्धेत 6000 हून अधिक उत्साही धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना 15 लाखहून अधिक रुपयांच्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेत नोंदविली वेळ
पुरूषांच्या अर्धमॅरेथॉनप्रमाणे महिलांच्या अर्धमॅरेथाँनमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चुरस पहायला मिळाली नाही. आरती भवानीने 1 तास 22 मिनीटे 53 सेकंद अशी वेळ नोंदवत महिलांची 21 किलोमीटर अंतराची अर्धमॅरेथॉन जिंकली. ही शर्यत जिंकताना आरतीने अनिता राणीला तब्बल 10 मिनीटांच्या फरकाने मागे टाकले. अनिताने 1 तास 32 मिनीटे 6 सेकंद अशी वेळ नोंदवली. नेहा ग्रोव्हरने तिसरे स्थान मिळवताना 1 तास 43 मिनीटे 18 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.