नवी दिल्ली-आज कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील नेते त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहे. दरम्यान द्रमुख नेते स्टालिन यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. यावेळी देशातील विविध विषय आणि समस्यांवर चर्चा झाली असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. आगामी काळात महाघाडी अधिक मजबूत होण्यासाठी द्रमुखची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे असे राहुल गांधींनी सांगितले.