बंगळुरु । क्रिकेट जगात टीम इंडियाची वॉल म्हणून आपल्या फलंदाजीने प्रसिध्द असलेला व भारतीचा माजी क्रिकेटर राहूल द्रविड याने बंगळुरू विद्यापीठाकडून देण्याचा निर्णय घेतलेल्या ‘ डॉक्टरेट’ स्वीकारण्यास नकार दिला आहे. यापुर्वी सुध्दा राहुल द्रविडने डॉक्टरेट पदवी नाकारली होती.नाकारण्यामागे कारण देतांना राहूल द्रविड म्हणाला की, डॉक्टरेट मिळवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही कामगिरी केलेली नाही.असे असतांना अशी डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण खेळाच्या क्षेत्रात्र संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करून अशी विनम्र प्रतिक्रिया द्रविडने दिली.
खेळ क्षेत्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळविण्याचा प्रयत्न
भारतीय क्रिकेट संघाची वॉल राहुल द्रविडचे लहानपण आणि प्राथमिक शिक्षण बंगळुरुतच झाले आहे. त्यानंतर पुढे क्रिकेटमध्ये संयमी खेळ करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. हे सारं लक्षात घेऊन बंगळुरु विद्यापीठाने 27 जानेवारीला होणार्या 52 व्या दीक्षांत समारंभात द्रविडला ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.बंगळुरु विद्यापीठाचे कुलपती बी. थिमे गौडा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे आभार मानले आहेत. मात्र, पदवी स्वीकारण्यास नम्र नकार दिला आहे.क्रीडा क्षेत्रात सखोल संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा निर्धार द्रविड यांनी केला आहे.यापुर्वीही द्रविडने डॉक्टरेट पदवी घेण्यास नकार दिला होता. 2014 साली गुलबर्गा विद्यापिठाकडून 32 व्या दिक्षांत समारंभात त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.
मार्गदर्शकाच्या भूमिकेत द्रविड
राहुल द्रविडने आपल्या यशस्वी क्रिकेट कारकीर्दीतून 2012 साली निवृत्ती घेतली आणि त्यानंतर क्रिकेट क्षेत्रात काम करतो आहे. मार्गदर्शन असो वा निवड, द्रविड कायमच टीम इंडियाच्या मदतीला धावून आला आहे. द्रविड सध्या ‘ए’ आणि ‘अंडर-19’ या टीममधील नव्या दमाच्या क्रिकेटर्सनाल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.