चेन्नई : द्रविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या चेन्नईतील तिरप्पूरमधील पुतळ्यावर अज्ञातांनी चप्पल ठेवून त्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची समोर आली आहे.
यापूर्वी मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडवण्यात आले होते. इरोडे वेंकटप्पा रामास्वामी असे त्यांचे नाव आहे. मात्र, पेरियार या नावानेच ते परिचित होते. सदर घटनेचा शोध सुरू आहे. याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.